Skip to main content

Posts

सरते वर्ष

प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम करतीलच. काही माेरपंखासारखे मखमलित हाेते तर काही निवडुंगाच्या काटयांसारखे तिक्ष्ण, धारधार. अगदि खाेलवर जख्म हाेवुन व्रर्ण साेडणारे. पश्चातापांच्या अश्रुंनी कुस बदलुन कितीतरी रात्री माेठया केल्यात. सकाळचं खाेटं-खाेटं हसु हे राेजच्या जगण्याचा भाग झालाय. मनगटावर अडकवलेल घडयाळ त्याच्या साेयीनुसार नाचवतय. अपेक्षाभंगाच दु:ख स्वत:ला निल्लर्ज आणि हतबल बनवते. आयुष्याची गणितं जुळुन येत नाहीत आणि जबाबदार्‍यांचा पसारा वाढताेय. न घडलेल्या गाेष्टींचा हक्क हा कमनशीबाचा भाग हाेता. खुप सार्‍या तक्रारींचा सुर आळवुन हे वर्ष त्याची कात बदलुन नवीन रुप घेईल. कळत-नकळत ज्यांनी दुखावल त्यांना न मागताच माफी, आणि आपल्यालामुळे जे दुखावलेत त्यांनी क्षमस्व असावे. नवीन वर्षात काय-काय करायच हयाचा संकल्प काही अजुन झालेला नाही, पण काय नाही करायच हयाची मात्र पक्की खुणगाठ मनाशी बांधलेली आहे. सरते शेवटी आलेल्यांना सामाेरे जायचे आणि शहाणपणात वाढ करुन घ्याय
Recent posts

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केलं जात वेळप्रसंगी समज किंवा मार देवुन आपल्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला जाताे पण खरच आपल्यात बदल हाेताे का? वडीलधारी माणंस पण वयाचा दाखला देत दुर्लक्ष करतात आणि तिच आपली सवय हाेवुन जाते. जीभेला हाड नसते अस म्हणतात पण तिची धार कुठल्याही शस्त्रापेक्षा कमी नाही. वेळ मिळेल तसा समाेरच्यावर तिने घात करत असताे. समाेरच्याच्या मानसिकतेचा विचार न करता. आपलेच शब्द आपल्याला गाेड वाटु लागतात. समाेरच्यांच्या वेदनांच आपल्याला काही घेण-देणं नसत, आपण फक्त समाेरच्याचा पानउतारा करावा एथेच्छ, अगदी शत्रु असल्यासारखा, खरच अश्या आसुरी आनंदाला काय अर्थ. काही शब्द खरच खाेलवर जख्म करतात अगदि न भरुन येणारी. माणसांबद्दल वाईट मतं कधीच बनवु नका, त्यांने नात्यातली दरी वाढते. जाताना काय साेबत घेवुन जाणार हयाची एकदा यादी करुन बघा, एक जरी वस्तु आपल्या यादित आली तर जीवनाच सार्थक हाेईल. का करावा इतरांचा द्वेष, मत्सर, लाेभ, त्यांनी आप

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावना किंवा वस्तु. पण कितीही झाल तरी जितके महत्‍तव आपण एखादयाला देताे त्याच्या तुलनेत आपल्याला मिळालेल कमीच का वाटत? लाेक आपल्याला कायम एक पर्याय म्हणुनच ठेवतात ही भावना किती भयावह आहे ना, एखादया बंद खाेलीत आपल्याला काेंडुन ठेवल्यासारख. EXPECTATIONS KILLS अस म्हणतात ते तंताेतत खर आहे. जवळच्या माणसांनी दिलेली दु:ख जास्त खाेलवर रुतुन बसतात. जाणतेपणे घडलेलं नसेलही अस समजुन आपण त्यांना अजुन संधी देताे कारण तिच/त्याच असणं खुप गरजेच असत आपल्या आयुष्यातली ती पाेकळी भरुन काढण्यासाठी. मन घाबरत दुसर्‍या काेणाला जवळ करायला, ती/ताे पण तशीच वागली तर. अनुभवाच झापड न पडलेलच बर. दुसर्‍याच्या आयुष्यात स्व:तच स्थान काय हया प्रश्नाच उत्तर शाेधायला कधिच जावु नका. गर्दिच्या ठिकाणी जीव काेंडल्याशिवाय राहणार नाही. तुमचा त्यांच्या आयुष्यातला क्रम काहीही असाे, फाेनमध्ये नाव काहीही असाे, फाेटाेत तुम्ही टॅग नसालही पण तुम्ही असाल त्यांच्यासाठी एक

मायाजाळ-फेसबुक

फेसबुक सुटल, हाे हाे सुटलच. काेणी बाेल्ल का, काेणाला दाखवायच म्हणुन नाहीतर. कंटाळला जीव. फेसबुकमुळे खुप विचित्र सवयी लागत हाेत्या. तासन् तास ते ५ इंचाच्या स्क्रिनमध्ये डाेक खुपसुन बसायला लागत हाेत. दुसर्‍याच वाकुन बघायची तीव्र इच्छा व्हायची. समाेरच्याच्या प्रत्येक वागण्याला मी लाईक्स आणि कमेन्टनी मापत गेलाे. लाेक किती छान आयुष्य दाखवतात ना फेसबुकवर, अगदि एखादयाला हेवा वाटावा इतक. निल आर्मस्ट्राँग जसा चंद्रावर जाणारा पहिला माणुस हाेता तस हे पृथ्वीवरच्याच कुठल्यातरी काेपर्‍यात  मीटरभर जावुन चेकइन करत असतात. खाताना साेनंचांदी खाताे असे डिशेसचे फाेटाे टाकताे. मित्रमैत्रीणिंना कधीही स्व:ताहुन मेसेज न करणारे, प्रत्येक फाेटाेत टॅग करायच कधीच विसरत नाहीत. किती आभासि जगताे ना, तुम्ही काय आणि मी काय आपण सगळयांनी थाेडयाफार फरकाने हेच केलय आणि करत राहु. खरच हयाची गरज आहे का, कधीतरी विचारु स्व:ताला प्रश्‍न. उत्तर नाहीच भेटल तर थाेडया दिवस लांब राहु, मन चलबिचल हाेईल, लक्ष जाईल अॅप कडे, सुंदर सुंदर फाेटाेज टाकायचा माेह हाेईलही. काेणी काय अपलाेड केलय हयाची लालसा हाेईल शेवटी इतक्या दिवसाच्या सवय

रिमा लागु

चित्रपटातील आईच्या भुमिका सार्थ निभावण्याची क्षमता ज्या थाेडया अभिनेत्रींमध्ये आहे त्या यादि मधल्या एक म्हणजे "रिमा लागु"... तुमच्या अभिनयाच्या कक्षा फक्त मराठीपर्यंतच मर्यादित न राहता त्या हिंदी सृष्टीत सुध्दा पसरवल्या. श्रीमान-श्रीमती मधली ती भाेळसट बायकाे,  तुतु-मैंमै मधली नाटाळ-अवखळ सासु अजुनही आमच्या ठळक लक्षात आहेत. मैंने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है काेैन, कल हाे ना हाे, कुछ कुछ हाेता है हयात तुम्ही वठवलेल्या भुमिकेत मायेचा आेलाव जास्त हाेता. नाटक रंगभुमीवरचा तुमचा वावर सांगता येणार नाही इतका विस्तीर्ण आहे. हिंदी पडदयावर तुम्हाला बघितला का अभिमान जरा जास्त वाटायचा. चंंदेरी दुनियेतल्या तसेच खाजगी आयुष्यातल्या विविध भुमिका पार पाडता पाडता तुमची झालेली एक्झिट थाेडी चटका लावणारी आहे. ईश्वर तुमच्या आत्मयास शांती देवाे.... समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा) PC: Google.co.in

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले

कल्पतरु

कधी कधी वाटत... अगदि लहान असल्यासारखं तिला घट्ट मिठी मारुन ढसाढसा रडावं. लहानपणापासुन आतापर्यंत आपल्यामुळे झालेला त्रास, मनस्ताप हयाचि उजळणी करुन माफी मागावी. रागात आपल्या ताेंडातुन निघालेले धारधार शब्द किती लागले असतील ना तिच्या मनाला. जन्माला येवुन तिचा वांझाेटापणा दुर करुन तिच्यावर उपकार केल्यासारखे आपण वागताे. किती सहज गृहित धरताे आपण तिला. तिच्या इच्छा-अपेक्षांची यादि तेव्हाच फाडुन फेकुन दिली जेव्हा आपला जन्म झाला. अख्ख आयुष्य वेचल तिने आपल्याला घडवण्यात, बदल्यात कसलीच अपेक्षा न ठेवता. तरी आपण जरा कुठे कमी पडले का शहाणपणाचे धडे गिरवताे. घालुन पाडुन बाेल्ल का आपल्या कसं बरं वाटत. आपल्या पंखात जिने बळ भरलयं. तिच आपल्या मायेला पारखी झालिये. कितीही नालायक असलाेतरी बापासमाेर वकीली तीच करते. तुमचं कस हाेणार हया विचारांच आेझ घेऊन ती हया वयात रात्रिची कुस बदलते. आपण मात्र तिला दुखवुन सुध्दा साखरझाेपेत असताे. वयाेमानानुसार ती सुध्दा खुप थकलीये. खुप शारिरिक वेदना तिला सुध्दा खुपतायेत पण त्याची झळ तुम्हाला कधीच बसु देणार नाही. आपण माेठ हाेण्याच्या नादात तिच्यापासुन तुटत चाललाेय. ती न